प्रकाशन क्षेत्रातील योगदान
मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी कटिबद्ध असलेले मुक्ता पब्लिकेशन हे वाचक, लेखक आणि संस्कृती यांना एकत्र आणणारे व्यासपीठ आहे.
समृद्धी प्रकाशन संस्था, हिंगोली तर्फे देण्यात येणारा ‘राष्ट्रीय संत नामदेव कथासाहित्य पुरस्कार – 2022’ श्री. विजय बिंदोड (पांढरकवडा, जि. यवतमाळ) यांच्या ‘भुडईतल्या वाफा’ या मुक्ता पब्लिकेशन प्रकाशित पुस्तकास प्राप्त झाला.
तसेच संत किसन महाराज सुडके ग्रामीण विकास प्रतिष्ठान, कंगोणी (नेवासा, जि. अहिल्यानगर) आयोजित साहित्य पुरस्कार स्पर्धेत मा. तुळशीराम बोबडे यांच्या ‘सत्संग’ या पुस्तकास सन्मान मिळाला.
डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व कायम असून, साहित्य समाजाची वैचारिक, सामाजिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक जडणघडण दर्शवते. मराठी साहित्याचे संवर्धन आणि प्रकाशन हे मराठी समाजमनाचे प्रतिबिंब आहे.
