साहित्य पाठवा


5t

शब्दप्रकाश

(वऱ्हाडवृत्त साप्ताहिकाचे साहित्यिक पान)

वऱ्हाडवृत्त हे दर बुधवारला प्रकाशित होणारे साप्ताहिक वृत्तपत्र असून, समाजातील सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सातत्याने करीत आहे. या प्रवाहाला अधिक व्यापक आणि सशक्त करण्याच्या उद्देशाने वऱ्हाडवृत्त साप्ताहिकात दर आठवड्याला ‘शब्दप्रकाश’ हे स्वतंत्र साहित्यिक पान प्रकाशित करण्यात येत आहे.

‘शब्दप्रकाश’ या साहित्यिक पानाच्या माध्यमातून वऱ्हाडसह संपूर्ण मराठी साहित्यविश्वातील कवी, लेखक, विचारवंत व नवोदित साहित्यिकांना आपली साहित्यिक अभिव्यक्ती मांडण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. कविता, लघुलेख, वैचारिक लेख, पुस्तक समीक्षण तसेच साहित्यक्षेत्रातील घडामोडी अशा विविध साहित्यप्रकारांद्वारे समाजमनाशी संवाद साधणारे, संवेदनशील व दर्जेदार साहित्य वाचकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

मराठी साहित्याच्या अभिव्यक्तीला प्रकाश देणारे हे साहित्यिक पान म्हणजेच ‘शब्दप्रकाश’. साहित्यिकांनी आपले मौलिक व दर्जेदार साहित्य वऱ्हाडवृत्त साप्ताहिकाच्या ‘शब्दप्रकाश’ पानासाठी पाठवावे.


साहित्यिक पान – नियम व अटी

  1. वऱ्हाडवृत्त साप्ताहिकाच्या साहित्यिक पानासाठी पाठविलेले साहित्य लेखकाचे स्वतःचे व मौलिक असणे आवश्यक आहे.
  2. साहित्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कॉपीराइट उल्लंघन, द्वेषमूलक, अश्लील अथवा आक्षेपार्ह मजकूर नसावा.
  3. प्राप्त साहित्य संपादकीय समितीच्या तपासणीनंतरच प्रकाशित किंवा नाकारले जाईल.
  4. साहित्य वऱ्हाडवृत्त (मुद्रित साप्ताहिक) तसेच आवश्यकतेनुसार डिजिटल माध्यमावर प्रकाशित करण्याचा अधिकार संपादकांकडे राहील.
  5. प्रकाशित साहित्यामध्ये आवश्यकतेनुसार भाषिक, व्याकरणिक किंवा शीर्षकासंबंधी बदल करण्याचा अधिकार संपादकांकडे राखीव राहील.
  6. एका अंकात किती साहित्य प्रकाशित करायचे याचा अंतिम निर्णय संपादकीय मंडळाचा राहील.
  7. साहित्य प्रकाशित न झाल्यास त्याबाबत कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही.
  8. साहित्य पाठविताना लेखकाने आपले पूर्ण नाव, संपर्क क्रमांक व ठिकाण नमूद करणे आवश्यक आहे.
  9. साहित्य पाठविल्याचा अर्थ, वरील सर्व नियम व अटी लेखकास मान्य आहेत, असा समज केला जाईल.

खालील फॉर्म भरून आपले साहित्य पाठवा