About Us

‘मुक्ता पब्लिकेशन : ‘साहित्यसंवर्धनासाठी  सजग आणि समर्पित!’

‘मुक्ता पब्लिकेशन’ ही प्रकाशन संस्था 1999 पासून कार्यरत असून, साहित्याच्या गुणवत्तेवर नितांत प्रेम करणाऱ्या लेखकांसाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ आहे. आमचं मुख्य ध्येय म्हणजे दर्जेदार पुस्तकनिर्मिती करताना लेखकाच्या सर्जनशीलतेला न्याय देण्यासाठी वाजवी किमतीत उत्तम सेवा देण्यास सदैव कटिबद्ध आहोत.

आमच्या प्रकाशन संस्थेची ओळख खालील वैशिष्ट्यांमुळे आहेः

  • गुणत्तापूर्ण व दर्जेदार छपाई : प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून स्पष्ट, नितळ आणि टिकाऊ मुद्रण.
  • बहुरंगी, सुबक आणि आकर्षक मुखपृष्ठे : वाचकांच्या नजरा खिळवणारे आधुनिक डिझाईन्स.
  • वाजवी किंमत : दर्जात कोणतीही तडजोड न करता किफायतशीर दर.
  • वक्तशीर सेवा : दिलेल्या वेळेत काम पूर्ण करणे हा आमचा मुख्य मंत्र.
  • ग्राहकसमर्पित दृष्टिकोन : ग्राहकांच्या गरजा समजून त्यानुसार सेवा.
  • ISBN: क्रमांक प्राप्त करतो, ज्यामुळे प्रत्येक पुस्तकाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य दस्तऐवजीकरण होते.

प्रकाशन प्रक्रियेमागील आमची दृष्टी

प्रत्येक पुस्तक ही एक ‘सर्जनशील निर्मिती’ असते. ती केवळ मजकुरापुरती मर्यादित नसून, तिच्यामागे अनेक घटकांचे कौशल्य कार्यरत असते.  मुद्रक, मुद्रितशोधक, मांडणीकार, चित्रकार, बांधणीकार आणि कागदाचा प्रकार. म्हणूनच, उत्तम पुस्तकनिर्मिती ही एक ‘सामूहिक सांस्कृतिक प्रक्रिया’ आहे, आणि आम्ही तिचा आदरपूर्वक भाग आहोत.

आमची जबाबदारी

प्रकाशन हे केवळ व्यावसायिक क्षेत्र नसून, ते एक ‘सांस्कृतिक जबाबदारीचं काम’ आहे. ग्रंथप्रकाशनाद्वारे आम्ही ‘साहित्यसंवर्धनाचे कार्य’ करतो, जे समाजाच्या बौद्धिक समृद्धीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

आमची मान्यता

आम्ही ‘राजा राममोहन रॉय राष्ट्रीय ISBN एजन्सी’ कडून ISBN क्रमांक प्राप्त करतो, ज्यामुळे प्रत्येक पुस्तकाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर योग्य दस्तऐवजीकरण होते.

पुरस्कारप्राप्त पुस्तके

मुक्ता पब्लिकेशनच्या प्रकाशनातून आजवर अनेक पुस्तके विविध पारितोषिकांनी सन्मानित झाली आहेत. ही आमच्या कार्यगौरवाची आणि गुणवत्तेची जिवंत साक्ष आहे.

संपर्क करा

आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा प्रवास दर्जा, सौंदर्य आणि सांस्कृतिक मूल्यांसोबत घडवायचा असल्यास, मुक्ता पब्लिकेशन, सम्यक संबोधी वाचनालयाजवळ, रणपिसे नगर, अकोला, मो. : 9850471520 येथे  तुमचं स्वागत करतं.