Testimonies


m12

मुक्ता पब्लिकेशनसोबतचा अनुभव लेखक व वाचक शब्दांत मांडतात—
विश्वास, गुणवत्ता आणि साहित्यप्रेमाची ही साक्ष आहे.

तुळशिराम बोबडे

मुक्ता पब्लिकेशन हे लेखकांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठा आधार आहे. आपलेपणा, विश्वास, दर्जा आणि अत्यंत कमी खर्चात, तेही ठरलेल्या वेळेत घरपोच काम करून देण्याची त्यांची कार्यपद्धती लेखकांची मने जिंकणारी आहे. त्यामुळे लेखक पूर्ण विश्वासाने आपले लेखन त्यांच्याकडे सोपवतो. विशेष म्हणजे, काम दिल्यानंतर त्वरित आगाऊ रक्कम देण्याची मागणी मी त्यांच्याकडून कधीच ऐकलेली नाही.

मुक्ता पब्लिकेशनकडून प्रकाशित झालेल्या पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत, तसेच या संस्थेलाही विविध सन्मान प्राप्त झाले आहेत. ही संस्था ISBN नोंदणीकृत असून प्रूफरीडिंग, डिझाईन, मुखपृष्ठ निर्मिती अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देते. त्यामुळे हे पब्लिकेशन लेखकांना आपलेसे वाटते आणि त्यांच्यासाठी एक विश्वासार्ह आधार ठरते. मुक्ता पब्लिकेशनला माझ्या मनःपूर्वक लाख लाख शुभेच्छा.