Sale!

फर्दळ (कवितासंग्रह)

Original price was: ₹100.00.Current price is: ₹80.00.

Category:

Description

कवी आणि कवितेविषयी…

उद्धव गावंडे यांचा दि. १ ऑगस्ट १९६४ रोजी सधन शेतकरी कुटुंबात बहीरखेड, ता. जि. अकोला येथे जन्म झाला. जाणत्या वयात शेती, शेतकरी संबंधित असणाऱ्या ग्रामीण बँकेत सेवा. लहानपणापासून शेती-मातीची आवड. संस्कारातून वाचनाची सवय. त्यातूनच मायबोलीतून लेखणीद्वारे जे झिरपलं ते ‘फुल्लोर’ आणि आता ‘फर्दळ’मध्ये संग्रहीत केलं, ज्यांचा बोलीतील सौंदर्य शब्दात ओतणारे लोककवी प्रा.डॉ. विठ्ठल वाघ यांनी ‘कळ्यांची फुले’ म्हणून गौरव केला. ‘झपूर्झा’ या लघुनियतकालिकाचे संपादक म्हणूनही उद्धव गावंडे यांनी कार्य केले.

श्री गावंडे यांच्या मनात उत्स्फूर्तपणे प्रकट झालेले भाव काव्यात शब्दबद्ध केले. लय, नादमयता, गेयता, भाव प्रकटीकरणाची मुक्त शैली, संदर्भसंपृक्तता, शब्दकळेतील सूचकता, निसर्गातील प्रतिमा, उपमा, रूपके, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, कल्पकता, शेतकरी संस्कृतीचे मार्मिक चित्रण, साधेपणा आणि गोडवा हे त्यांच्या कवितेचे महत्त्वाचे विशेष आहेत.

वऱ्हाडी बोलीभाषेचा पोत सजीव ठेवत ग्रामीण जीवनाच्या अंगांना स्पर्श करत कृषीनिष्ठा, लोकपरंपरा, माती, निसर्ग, प्राणी, ऋतू, संसार, समाज आणि मानवी स्वभाव याबद्दल आपल्या भावना कवितेतून अविष्कृत केल्या आहेत.

बोलीभाषेला वऱ्हाड मातीचा गंध असल्यामुळे त्यांचे काव्य मनात घर करते. ‘फर्दळ’ ह्या त्यांच्या या काव्यसंग्रहातील कवितातूनही हा सुगंध वाचकांना जाणवेल !

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “फर्दळ (कवितासंग्रह)”

Your email address will not be published. Required fields are marked *