Description
‘यलाई’ ही पारंपरिक घटनाकेंद्रित कादंबरी नसून, मानवी मनातील जाणिव-नेणिवांचे, भावविश्वाचे आणि जीवनचिंतनाचे प्रवाही रूप आहे. दत्तात्रय पाटील या तरुणाच्या जीवनप्रवासाभोवती ही कादंबरी गुंफलेली असून ‘यलाई’ नदी त्याच्या अस्तित्वाचा, चिंतनाचा आणि जीवनप्रवाहाचा केंद्रबिंदू ठरते. घटनांपेक्षा मनातील संघर्ष, द्वंद्व, भावनिक गुंतागुंत आणि निसर्गाशी असलेले नाते यांना येथे अधिक महत्त्व आहे.
दत्तात्रयच्या आयुष्यात येणाऱ्या सैरंध्री, गायत्री आणि अपूर्वा या तीन स्त्री व्यक्तिरेखा प्रेमाच्या विविध छटा उलगडतात; मात्र हे प्रेम शारीरिक वा सामाजिक चौकटीत अडकत नाही, तर मानसिक व भावनिक पातळीवर व्यक्त होते. नोकरी, शिक्षण, गाव-शहर संघर्ष, काळी जमीन विक्रीची वेदना, आई-वडील, मित्र, नाते-संबंध आणि निसर्गाशी तुटत-जुळत जाणारे संबंध यांतून दत्तात्रयचे अंतर्मन उलगडत जाते.
‘यलाई’ नदीप्रमाणेच ही कादंबरी निश्चित शेवटाकडे न जाता सतत वाहत राहते. मानवी जीवनातील अस्थिरता, प्रवाहीपणा, प्रेम, वात्सल्य, अपराधभाव आणि अस्तित्वाचा शोध यांचे सूक्ष्म, कलात्मक चित्रण म्हणजेच ‘यलाई’ होय.



Reviews
There are no reviews yet.